आसाराम बापू बलात्कारीच; जोधपूर न्यायालयाचा फैसला

आसाराम बापू बलात्कारीच; जोधपूर न्यायालयाचा फैसला


File photo of Asaram.

Image result for आसाराम बापू बलात्कारीच; जोधपूर न्यायालयाचा फैसला\

जोधपूर: लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूसह तीनजणांना दोषी ठरविण्यात आलं असून दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जोधपूर न्यायालयाचे न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांनी हा निर्णय दिला. दरम्यान, आजच आसारामच्या शिक्षेवर फैसला होणार असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

आसाराम बापूच्या शिक्षेनंतर कोणतीही हिंसा भडकू नये म्हणून राजस्थानसह तीन राज्यांत अॅलर्ट जारी करण्यात आला होता. विशेष म्हणजे जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोर्टातच आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी आसारामसह त्याचे सहकारी शिल्पी आणि शरद यांना दोषी ठरवण्यात आलं असून शिवा आणि प्रकाश या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आसारामच्या शिक्षेवर न्यायालयात युक्तीवाद सुरू असल्यानं त्याला आजच शिक्षा सुनावली जाणार असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. निकालपत्र वाचल्यानंतर विधीज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचा निर्णय घेणार असल्याचं आसारामच्या आश्रमाच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी सांगितलं. निकालाच्या पार्श्वभूमीवर आसारामची बाजू मांडण्यासाठी १ ४ वकील कोर्टात हजर होते. तर पीडितेची बाजू मांडण्यासाठी फक्त दोनच सरकारी वकील होते. यावेळी कारागृहाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षेच्या पार्श्वभूमीवर जोधपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. जोधपूरला छावणीचं स्वरूप आलं आहे. 

न्याय मिळाला... 

आसारामला दोषी ठरविण्यात आलं आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. या लढाईत आम्हाला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली.



Comments

Popular posts from this blog

VIVO IPL 2018 LIVE CRICKET SCORE, MATCH STREAMING ONLINE ON HOTSTAR, WATCH MI VS CSK ON STAR SPORTS, DREAM 11

IIFA 2018: The BEST and WORST dressed at the green carpet

Xiaomi Redmi 6 Pro launched